राज्यातील पाऊस पुन्हा थांबणार; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून सतत पावसाने हजेरी लावली होती. परंतु कालपासून त्याचा वेग कमी झालेला दिसतोय. शेतकऱ्यांच्या मनातअसा प्रश्न येतो की, आता परत राज्यात पाऊस उघडेल देणार का..? तर चला या प्रश्नाचे उत्तर पाहूया या लेखात

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये जी वायव्य चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. तिचा वेग आता कमी झाला आहे. व ती आता राज्यापासून दूर गेल्याने राज्यात पावसाचा जोर देखील कमी होणार आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील 160 गावांना मिळणार अग्रीम पिक विमा..! वाचा सविस्तर

परंतु अजून सुद्धा ती द्रोनिक स्थिती छत्तीसगड पासून ते ईशान्य राजस्थान पर्यंत असल्याने त्याचा परिणाम विदर्भात होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात येणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. राज्यामध्ये आज कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात आज 24 तासाच्या आत मध्ये बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात जास्त करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार आठवडे राज्यात कमी जास्त पाऊस पडू शकतो.

हे वाचा: कुसुम सोलर पंप अनुदान योजना..! असा करा ऑनलाईन अर्ज; पहा कागदपत्रे कोण कोणती लागतात..? Solar Pump Online Form Kasa Bharaycha

Leave a Comment