यावर्षी परतीचा पाऊस कमीच रामचंद्र साबळे

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. यावर्षी बिपर जॉय या चक्रीवादळामुळे उशिरा झालेले मान्सूनचे आगमन व ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड यामुळे पन्नास टक्के महाराष्ट्राला दुष्काळाचा धोका आहे.

अजून सुद्धा दुष्काळी जिल्ह्याची गावांची व तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे रामचंद्र साबळे म्हणतात. परिणामी दुष्काळ सुद्धा वाढू शकतो. बिपर जॉय चक्रीवादळ झाल्यानंतर एल निनो मुळे पावसाचा प्रभाव कमी झाला.

हे वाचा: महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमधील टोमॅटो बाजारभाव फक्त एका क्लिकवर

सप्टेंबर महिन्यात सुद्धा समाधानकारक पाऊस पडेल याची शक्यता त्यामुळे परतीच्या पावसावर अवलंबून राहणे पर्याय नाही. असं रामचंद्र साबळे म्हणतात. राज्यातील काही काही भागात दुष्काळी परिस्थिती वाढतच चालली आहे.

यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा जाणवू शकते. रामचंद्र साबळे म्हणतात जून महिन्यात मी सांगितल्याप्रमाणे सरासरीपेक्षा कमीच पाऊस होईल आणि तसेच झाले.

राज्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडेल याचा अंदाजही मी काढला.रामचंद्र साबळे यांचा अंदाज.मध्ये आणि पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी एवढा पाऊस पडेल, तर पश्चिम विदर्भातसरासरी 93% कमी पाऊस पडेल. ही माहिती रामचंद्र साबळे यांनी दोन जून रोजी दिली होती.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! एका महिन्याच्या आत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के आगाऊ पिक विमा

Leave a Comment