पहा तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी होणार? हवामान खात्याकडून मोठे अपडेट

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने खंड दिला होता. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली. परंतु काही भागात अजून सुद्धा पाऊस दडी मारून बसला आहे. यातच हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पुढील चार-पाच दिवसात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा कोकण आणि विदर्भात येथे दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. पाच व सहा सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, व परभणी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर वाशिम भंडारा गडचिरोली आणि अमरावती तर कोकणातील रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे गेल्या महिन्यापासून वाट पाहत असणाऱ्या बळीराजाला तसेच सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यामध्ये खरीप हंगामात पेरलेल्या पिकांचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे.

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

खरीप हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत. परंतु हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment