महाराष्ट्रात परतीचा पाऊस केव्हा पासून..? तज्ञांनी दिली माहिती..! Return rain

सध्या मान्सून शेवटच्या टप्प्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांमधून मान्सून ने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. अशातच मान्सून महाराष्ट्रतुंन केव्हा माघार घेणार..?

याबाबत माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी मानसून राज्यात येतानाच उशिरा आला. राज्यामध्ये जून मध्ये येणारा मान्सून जुलैमध्ये दाखल झाला.

हे वाचा: IMD: या जिल्ह्यात पडणार आज तुफान पाऊस..! IMD चा मोठा अलर्ट

मान्सून उशिराने दाखल झाल्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा जून महिन्यात पावसाची नोंद देखील कमी झाली आहे. परंतु जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्यातील तूट भरून निघाली.

जुलै महिन्यात राज्यातील विदर्भ, मराठवाडा त्याचबरोबर उत्तर आणि मध्य महाराष्ट्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्यातील पावसामुळे राज्यातील खरीप पिकांना जीवनदान तर मिळालेच.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भविष्याच्या शेती पिकासाठी पाण्याचा साठा उपलब्ध झाला. मात्र सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच. अचानक ऑगस्ट महिन्यात तब्बल पावसाने 21 दिवसाचा खंड दिला.

हे वाचा: हवामानात मोठा बदल; पुढील पाच दिवस या भागात मुसळधार पाऊस.. IMD

या खंडामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला होता. शेती पिकांचे नुकसान तर होऊच लागले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील उद्भवू लागल्या. मात्र सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे ही परिस्थिती बदलली.

सप्टेंबर महिन्यातील या पावसामुळे, राज्यातील बहुतांश धरणामध्ये पाण्याचा साठा ही मुबलक प्रमाणात वाढला आहे. काही शेतकऱ्यांच्या तर विहिरी सुद्धा तुडुंब भरल्या आहेत.

मात्र सप्टेंबर मध्ये जरी चांगला पाऊस झालेला असला. तरी सुरुवातीच्या काळात पावसाने उघडीप दिल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसाने सरासरी गाठली नाही.

हे वाचा: येत्या 24 तासात या अकरा जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस..!

महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हापासून सुरू होणार..?

पुणे हवामान विभागाचे हे प्रमुख व हवामान अभ्यासक अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास आज पासून सुरू होणार आहे.

त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरात पाऊस सुरू झाला.

परंतु आता बंगालच्या उपसागरात बदल झाला असून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज पासून म्हणजेच 6 ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसात पाऊस परतणार अशी माहिती कश्यप यांनी दिली आहे.

Leave a Comment