सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात..!

शेतकरी राजा दरवर्षी आपले पीक जोमाने पिकवतो त्याची वाढ करतो. परंतु वन्यप्राणी व इतर जंगली प्राणी त्याचा नास करतात. तोंडाला आलेला घास खाऊन घेतात.

त्यामुळे शेतकऱ्यांना या त्रासापासून मुक्त करण्यासाठी व जंगली प्राण्यांचा आणि शेतकऱ्यांचा होणारा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा कुंपण योजना जाहीर केली होती.

हे वाचा: या शेतकऱ्यांना नाही दिला जाणार पिक विमा..! पिक विमा अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर Crop insurance ineligible

आता सौर ऊर्जा कुंपण योजनेसाठी शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान डीबीटी द्वारे अर्थात डायरेक्ट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात देण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

16 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. सौर ऊर्जा कुंपण योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 15 हजार रुपये किंवा सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के असे अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजूर देण्यात आली आहे.

आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःल सौर ऊर्जा कुंपण विकत घेण्याची मूभा देण्यात आलेली आहे. आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात क्रेडिट केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे वाचा: तुमच्या शेतीत खांब किंवा डीपी आहे का? जर असेल तर, मिळतील महिन्याला 5 ते 10 हजार रुपये Transformer Subsidy

Leave a Comment