दिवाळीच्या काळातच सोयाबीनच्या बाजार भावात तेजी; आणखीन वाढणार दर Soyabean price increase

Soyabean price increase: महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विचार केला तर ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासादायक आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जसे कापूस पांढरे सोने आहे. तसेच सोयाबीन देखील पिवळ सोने म्हणून ओळखले जाते. परंतु मागील दोन ते अडीच वर्षापासून याच पिवळ्या सोन्याचा भाव अगदी कवडीमोल झाला आहे.

हे वाचा: 2024 मध्ये कापसाचे भाव 10000 जाणार..! पहा संपूर्ण माहिती व संपूर्ण देशातील आजचे कापुस बाजार भाव cotton rate

शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा सोयाबीन पिकातून नसल्यामुळे सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांना डोईजड झाले आहे. मागील वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावतच दिसत आहेत. यावर्षी तर सततच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन उत्पादनात देखील मोठी घट पाहायला मिळणार आहे.

पहिल्यांदा सोयाबीनच्या उत्पादनात घट असल्यास सोयाबीनचे बाजार भाव उच्चं की गाठायचे परंतु हे सर्व समीकरण उलटे फिरले असून सोयाबीनचा उत्पादनात मोठी घट झालेली आहे. त्याचबरोबर बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

परंतु सध्या दिवाळीच्या काळात सोयाबीनच्या बाजारभावात थोडासा चढ पाहिला मिळत आहे. बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव कधी वाढणार..! जानेवारीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव 10000 जाणार..? price of soybeans

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील बाजारभावाचा विचार करता सोयाबीन हे 5100 रुपयावर येऊन ठेपले आहे.

Leave a Comment