नवीन सोयाबीनला मिळतोय 5500 रुपये प्रतिक्विंटल भाव; ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कसे राहणार बाजार भाव..?

महाराष्ट्रात यावर्षी पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला आहे. या खंडामुळे राज्यातील सोयाबीनचे उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे. नवीन सोयाबीनला व जुन्या सोयाबीनला सरासरी साडेचार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

या भावामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन जरी कमी झाले असले. तरी सोयाबीनला बाजार भाव चांगला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात लवकरात लवकर विकायला नेऊ नये असे आव्हान देखील करण्यात आले आहे.

हे वाचा: पहा आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव..! Soyabean rate maharshtra

गतवर्षी सोयाबीनचा बाजार भाव..

गेल्या वर्षी अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सोयाबीनला सरासरी बाजार भाव हा आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळत होता.

यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात खरीप हंगामात कूण 6 लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तरी यापैकी 2 लाख हेक्टरवर फक्त सोयाबीनची पेरणी आहे. तर अडीच लाख हेक्टर मध्ये कापूस लागवड केली आहे. Soyabean rate maharshtra

हे वाचा: सोयाबीन, तूर बाजारभावात मोठा उलटफेर ; पहा बाजार समितीत कसा भाव मिळतोय Market Prices

पुणे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पात तज्ञांनी सोयाबीनच्या उत्पादनाच्या किमतीचा अंदाज लावला आहे. तज्ञांच्या मते सोयाबीनला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात लातूर बाजारपेठेमध्ये 4500 ते 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे. व हा अंदाज ग्रेड एफ ए क्यू दर्जाच्या सोयाबीन साठी जाहीर करण्यात आला आहे.

22 नोव्हेंबर पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत देशांमध्ये तब्बल 1.82 लाख टन सोयाबीन तेलाची आयात केली आहे. ही आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे चार लाख टनांनी कमी झाली आहे.

असे SEA अहवालात स्पष्ट झाले आहे. याशिवाय 2023 24 या कालावधीमध्ये भारतातील सोयाबीनचे उत्पादन बारा लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. Soyabean rate today

हे वाचा: कापसाचे बाजार भाव 8 हजार रुपये पार..! पहा आजचे मानवत, अकोट, सेलू , कापुस बाजार भाव Cotton market rate

अमेरिका देशाच्या कृषी विभागाच्या जुलै 2023 च्या नवीन अहवालानुसार जगामध्ये 2023-24 या कालावधीमध्ये 4,107,000 टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा आठ टक्क्यांनी अधिक आहे. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर होण्याची शक्यता वर्तवण्यात देखील आली आहे.

Leave a Comment