बाजारभावापेक्षा कमी दराने साखर विकून कोट्यवधींची वरकमाई sugar price

sugar price : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाेव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ११ साखर कारखान्यांकडून विक्री झालेल्या साखरेचा दर जाहीर केला. त्यानुसार, कारखानदारांनी खुल्या बाजारापेक्षा सरासरी ५० ते ३६३ रुपये कमी दराने साखर विक्री केल्याचे दिसून आले.

यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. शेट्टी म्हणाले, कारखानदारांनी पै-पाहुण्यांच्या ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यमातून साखर विक्री करून कोट्यवधींची वरकमाई केली आहे.sugar price

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ट्रॅक्टर ट्रॉली मिळणार 50 टक्के अनुदानावर

शेतकऱ्यांना नुकसान झाले

शेट्टी म्हणाले, खुल्या बाजारापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या सर्व कारखान्यांतील साखर कोणत्या कंपन्या व व्यापाऱ्यांनी खरेदी केली याची चौकशी केल्यास राज्यातील अनेक बडे नेते व साखर कारखानदार या आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडकणार आहेत.sugar price

दुसरा हप्ता देणे शक्य

हे वाचा: LPG गॅसच्या दरात मोठी कपात..! सिलेंडर तब्बल 300 रुपयांनी झाले स्वस्त LPG Gas Price

शेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. कारखान्यांकडे मार्चअखेर शिल्लक साठ्याचे मूल्यांकन करताना धरलेले दर आणि ज्या-त्या महिन्यात विकलेल्या साखरेच्या दरातील रक्कम यावरून हे स्पष्ट होते. sugar price

Leave a Comment