राज्यात पुढील तीन तासात भयंकर पाऊस..!

राज्यातील अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. आज कोकणातील रायगड पालघर रत्नागिरी व मुंबईमध्ये सुद्धा वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही तासात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.

ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल एक महिन्याचा खंड दिला होता. त्यामुळे खरीप हंगामात पेरलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच या खंडामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा भासली असती. राज्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने बहुतांश भाग व्यापला आहे परंतु अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही.

हे वाचा: महाराष्ट्रातील तुर बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या तीन ते चार तासातच वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

तसेच या जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. वरील जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून दर्शवण्यात आली आहे. तसेच या पावसाच्या धक्का मानवी जनजीवनाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी

राज्यात बऱ्याच ठिकाणी अजून सुद्धा चांगला पाऊस पडलेला नाही. परंतु आता लवकरच म्हणजेच पुढील तीन ते चार दिवसात. पावसाचा जोर वाढेल व सर्वत्र पाऊस बसेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हे वाचा: अशी करा ई पिक पाहणी दुरुस्ती..! केवळ 48 तासच उपलब्ध

Leave a Comment