या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, पण हे काम केले का..?

शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी सरकारकडून विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामधली एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. आता बरेच शेतकरी पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात येईल. पण त्यासाठी हे आवश्यक कामे करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे कामे पूर्ण केली नाही. त्यांना पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही.

हे वाचा: या 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..! Pik Vima Nuksan Bharpai

pm किसान योजनेने शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरला आहे. या योजने अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. या अगोदर पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 27 जुलै रोजी जमा करण्यात आला होता.

डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता कधी जमा करण्यात येईल याची ओढ लागली आहे. तर चला जाणून घेऊया..

पी एम किसान योजना केंद्र सरकार द्वारे जारी करण्यात आली होती. सुरुवातीला या योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरताच होता. परंतु आता या योजनेचा विस्तार झाला आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांची दिवाळी गोड पिक विमा रक्कम खात्यावर जमा..! कृषिमंत्र्यांनी पाळला शब्द Crop Insurance 2023

देशातील सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये तीनदा मिळून एका वर्षात टाकते. म्हणजेच या योजनेचे शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्ते मिळतात.

शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपये जमा होतात. या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल 31 जुलै या दरम्यान देण्यात येतो. दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर. तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

या तारखेला जमा होईल 15वा हप्ता..

हे वाचा: शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान...!

पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता सप्टेंबर महिन्यातील अंतिम तारखेपर्यंत जमा केला जाईल. अशी माहिती मिळत आहे. एकंदरीतच 30 सप्टेंबर पर्यंत पंधरावे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खातात जमा केले जातील.

पण ते पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी व्हेरिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर हे काम वेळेत पूर्ण नाही केले तर पंधरा व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करणे आवश्यक आहे.

यादीत नाव आहे की नाही कसे तपासायचे..?

पी एम किसान योजनेच्या पंधरावे हप्त्यात तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल pmkisan.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव बघता येईल.

या प्रकारे करा ई-केवायसी व्हेरिफिकेशन..

1) पी एम किसान मोबाईल ॲप वर फेस Authentication हे पिक्चर येते.

2) या ठिकाणी शेतकऱ्यांना घरी बसल्या ई केवायसी करता येते.

3) त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.

Leave a Comment