Agriculture insurance: येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

Agriculture insurance: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, बराच शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान कोविड काळात झाले. या शेतकऱ्यांना अजून सुद्धा प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही.

आता या शेतकऱ्यांचे लवकरच अच्छे दिन येणार आहेत. आठ दिवसात या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनींना दिले आहेत. अन्यथा खडक कारवाई केली जाईल असे देखील संकेत विमा कंपनींना दिले आहेत.

हे वाचा: या 11 जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर..! खात्यात येणारे हेक्टरी 22 हजार 500 रूपये

कधी मिळणार नुकसान भरपाई..? Agriculture insurance

कोविड काळात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळाली आहे. याकरिता अधिक कालावधी जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

याबाबत चर्चा करण्यासाठी सरकार द्वारे बैठका देखील घेतल्या जात आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हटले आहेत की, 2020 मध्ये कोविडचा काळ होता. काळामध्ये रोगांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला होता.

हे वाचा: फ्री मध्ये करा आधार कार्ड डाउनलोड; ते पण आपल्या मोबाईल मधून adhar card download

त्याचबरोबर शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. कोविडचा काळ सुरू असल्यामुळे शेतकरी बांधवांना विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार लवकर करता आली नाही.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीने आदेश दिले आहेत. की 2020 वर्षी एनडीआरएफ तर्फे खरीप हंगामात झालेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी.

अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. सहा कंपन्यांपैकी एकूण चार कंपन्यांकडे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 224 कोटी रुपयांची नुकसान भरपाई बाकी आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी करा या नवीन वाणांची लागवड new varieties

येत्या आठ दिवसात पिक विमा कंपन्यांनी जर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही केली. तर योग्य ती कडक कारवाई पिक विमा कंपन्यावर करण्यात येईल. असे संकेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Leave a Comment