राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी हा लाभ, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन..!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी राज्य सरकार द्वारे देण्यात आली आहे. नवीन आलेल्या अपडेट नुसार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 25% विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे.

काल म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घातलेल्या पावसाच्या धुमाकळीमुळे नागपूर जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे शेत बांध वाहून गेले. या बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी प्रत्यक्ष धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे कापुस बाजार भाव Cotton New price's

यावेळी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा या योजनेअंतर्गत पिक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या 25% अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळण्याची माहिती सुद्धा धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर देखील मोठ्या प्रमाणात किडीचा रोग पडला आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील शेती पिके, विविध नैसर्गिक आपत्ती व बोगस कीटकनाशकाच्या फवारणीमुळे खराब झाली असून. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध आश्वासन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यावर्षी राज्यातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. विशेष म्हणजे एक रुपयात पिक विमा योजना काढल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतर पिकाचा सुद्धा विमा काढला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हे वाचा: हरभऱ्यावर होतोय घाटेअळीचा प्रादुर्भाव..! घाटेअळीवर अशी करा उपाययोजना infestation of gram borer

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पावसाअभावी व विविध कारणामुळे झाले आहे. शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा दिवाळीपूर्वीच दिला जाईल. अशे आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर दिले आहे. या आश्वासनानुसार शासनाने जर शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच रक्कम जमा केली. तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.

याशिवाय ज्या क्षेत्रामध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त किंवा सतत चार ते पाच तास पाऊस झाला आहे. अशा अतिवृष्टी बाधित क्षेत्रांमध्ये पिकांसाठी राज्य आपदा मदत निधी ( एस डी आरएफ) हो केंद्रीय आपदा मदत निधीच्या ( एनडीआरएफ) नियमानुसार त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल. व ही मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा केली जाईल असे आश्वासन देखील कृषिमंत्री यांनी दिल आहे.

हे वाचा: रब्बी ज्वारी पेरताय, करा या वाणाची लागवड व मिळवा मोठ्या प्रमाणात उत्पादन..!

Leave a Comment