सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ..! या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक भाव; market committee

market committee: राज्यात चालू वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले तरी मागील वर्षी साठवून ठेवलेल्या सोयाबीनमुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण झाली असून ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटल या पातळीवर स्थिर आहेत.

आज दि. 20 डिसेंबर रोजी हिंगोली व बुलढाणा जिल्ह्यांमधील सिंदखेड राजा बाजार समितीत आवक कमी होती. यामुळे हिंगोली बाजार समितीत सर्वाधिक 5008 रुपये तर सिंदखेड राजा बाजार समितीत 4900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

हे वाचा: कापसाला 12500 तर सोयाबीनला 9000 रुपयापर्यंत भाव मिळणारं; रविकांत तुपकर..! New Market rate

हिंगोली बाजार समितीत 660 क्विंटल सोयाबीनची आवक होती. तेथे कमाल 5008 ते किमान 4650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सरासरी दर 4829 रुपये होता. सिंदखेड राजा बाजार समितीत 434 क्विंटल सोयाबीन आली होती. तिथे कमाल 4900 ते किमान 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला सरासरी 4500 ते 4800 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. अकोला बाजार समितीत सर्वाधिक 3598 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तिथे कमाल 4800 ते किमान 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

महागाईच्या काळातही सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 26 सप्टेंबर 2023

Leave a Comment