आज पासून राज्यात वाढणार पावसाचा जोर..! हवामान खात्याची मोठी अपडेट

सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज राज्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार तीन ते चार दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्यात 15 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज हवामान विभागातील जाणकारांनी दिला आहे. आज सकाळी पहाटेपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 7 सप्टेंबर 2023

या पावसामुळे पुण्यातील नागरिकांना वाहतुकीसाठी थोडासा त्रास सहन करावा लागला. परंतु शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई शहरात सुद्धा सात सप्टेंबर पासून मुंबईत पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आज जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मराठवाडा मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्यातील सर्व भागात पाऊस पडेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव म्हणतात महाराष्ट्रात पावसाला होणार सुरुवात

Leave a Comment