आजपासून वाढणार या जिल्ह्यात पावसाचा जोर..! पहा जिल्ह्यांची नावे

नमस्कार शेतकरी मित्रांनो. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन महाराष्ट्र मध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

आज म्हणजे सात सप्टेंबर रोजी राज्यातील बऱ्याच ठिकाणी मेघगरजेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व उरलेल्या राज्यात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हे वाचा: राज्यात पुढील तीन तासात भयंकर पाऊस..!

बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवळा आहे. परंतु ओडिसा समुद्र किनारपट्टीवर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रीय वारे वाहत आहे.

मान्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून. रायपूर, मंडला, गुना, कलिंगा पटननाम ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने बुधवारी सकाळी मराठवाड्यात विदर्भात अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.

बुधवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले. तब्बल 21 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर आज सकाळपासून पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे. आज कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तर विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

हे वाचा: पावसा बद्दल काय म्हणतात पंजाबराव डख लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग

या जिल्ह्यांना आज आहे जोरदार पावसाचा इशारा…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर

विजांसह पावसाचा इशारा

हे वाचा: पंजाबराव डख काय म्हणतात पावसाबद्दल... जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील नाशिक, नगर, परभणी, धाराशिव, लातूर, बुलढाणा, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

Leave a Comment