आज राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर..! Havaman Andaj

यावर्षी ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाचे थोडेफार आगमन झाले. परंतु बहुतांश भागात पाऊस कमी झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीने राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि विदर्भातील 20 जिल्ह्याचा समावेश आहे. या भागांना वादळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 11 सप्टेंबर 2023; kanda bajar bhav

त्याचबरोबर अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आज नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पावसाचा खंड भरून निघेल का..?

ऑगस्टमध्ये झालेला पावसाचा तब्बल 21 दिवसाचा खंड यामुळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु या पावसाने पावसाची मागची तूट पूर्ण होईल का नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

हे वाचा: पहा गुजरात मंडी चे आजचे कापुस बाजार भाव..

हवामान तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे प्रणाली तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यामध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढलेली आहे.

हे वाचा: आज पासून राज्यात वाढणार पावसाचा जोर..! हवामान खात्याची मोठी अपडेट

Leave a Comment