नवीन कापूस हंगामात कापसाला फक्त 5 हजार रुपये भाव..! पहा संपूर्ण माहिती cotton rate

 cotton rate: भाव वाढणार या आशेने बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. परंतु यावर्षी सुरुवातीच्या काळातच खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ही बातमी ऐकताच शेतकरी चिंतेत आला आहे.

गेल्या वर्षी कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कापसाला 12 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. याच आशेने कापूस विकला नाही. परंतु यावर्षी त्या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघा 5000 रूपये प्रतिक्विंटल दर. मिळत आहे. यामुळें कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

हे वाचा: कापूस बाजार भावाने गाठली उच्चांकी.! पहा संपूर्ण देशातील कापूस बाजार भाव cotton market prices

गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात कापसाला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळाला. कापुस बाजार भाव पुन्हा वाढणार या आशेने बऱ्याच शेतकरी बांधवांनी त्यांचा कापूस विकलाच नाही.

परंतु बराच टाईम गेल्यानंतर कापूस बाजार भाव सात हजारावरच आला. यामुळे पुढील हंगामात कापसांना चांगला दर मिळेल या आशेने तो पण कापूस बाजारात आणला गेला नाही.

परंतु यावर्षी कापूस नवीन हंगामात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस चार हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलदाराने मागितला जात आहे. त्यामुळे मोठी चिंता उभारली गेली आहे.

हे वाचा: संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव सप्टेंबर 30 सप्टेंबर 2023

Leave a Comment