पुढील 24 तासात राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात IMD

IMD: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने चांगलाच होणार जोर धरला आहे. परंतु मागील एक ते दोन दिवसापासून राज्यात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या 24 तासात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. या पावसाची सुरुवात विदर्भातील तुरळक जिल्ह्यापासून होईल.

हे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज; राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस Maharshtra rain

IMD: India metrological department

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भाग पट्टीत कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे, त्या भागात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात देखील तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. व बहुतांश भागात धुके पाहायला मिळेल. त्याचबरोबर अधून मधून पाऊस व थंडीची जाणीव देखील होईल.

मराठवाड्यातील देखील बहुतांश भागात पुढील 24 तासात पाऊस पडत राहील, परतीचा पाऊस महाराष्ट्रात बरेच दिवस मुक्काम ठेवण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे वाचा: पंजाब डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; या तारखेपासून पुन्हा धो धो पाऊस Panjab Dakh Andaj

देशातील मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यापासून परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. IMD च्या माहितीनुसार राज्यात सुद्धा अधून मधून पाऊस बरसेल व 10 ऑक्टोबर नंतर राज्यातील विविध भागात अधून मधून पाऊस पडत राहील.

Leave a Comment