राज्यात आज पासून पुढचे इतके दिवस असणार पावसाची उघडीप..! पहा पंजाबराव डख काय म्हणतात पावसाबद्दल

ऑगस्ट महिन्यातील बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला हळूहळू सुरुवात झाली होती. मागच्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढत होता.

परंतु काल रात्रीपासून हवामान कोरडे झाल्यामुळे, पावसानेविश्रांती घेतली का..? पाऊस पडणार की नाही आता.? असे प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवत आहेत. या प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 7 सप्टेंबर 2023

राज्यात पावसाचा जोरा हा सात सप्टेंबर नंतर वाढला. राज्यातील बऱ्याच ठिकाणी मागच्या दोन-तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. परंतु काही ठिकाणी अजून सुद्धा पावसाला सुरुवात झाली नाही. राज्यामध्ये सात सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अशा परिस्थितीतच पावसा संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे राज्यात आजपासून म्हणजेच 11 सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी होणार असेल 13 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस कमीच असेल. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

10 सप्टेंबर रोजी पंजाबराव डख यांनी सुद्धा नवीन अंदाज दिला होता. त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये असे नमूद केली होती की, पोळ्यानंतर म्हणजे 14 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर पुन्हा वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाहीये. पाऊसाला परत एकदा सुरुवात होणार आहे.

हे वाचा: येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पावसाचे कोणतेही संकेत नाहीत. 13 सप्टेंबर पासून राज्यात परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

Leave a Comment