राज्यातील या 20 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा…! जाणून घ्या सविस्तर

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. राज्यातील ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे राज्यात दुष्काळाची सावट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यातच 20 हजार शेतकरी पिक विमा साठी अपात्र असल्याचे पिक विमा कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. यावर्षी झालेल्या पावसाच्या उशिरा आगमनामुळे व त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यातील खंडामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले खरीप हंगामातील पिके करपू लागली त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले.

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

हे नुकसान भरून काढण्यासाठी व शेतकऱ्यांना हार्दिक मदतीचा लाभ होण्यासाठी पिक विमा देण्यात येतो. आता यात पण वीस हजार शेतकरी अपात्र असल्याचे विमा कंपन्या म्हणत आहेत.

पिक विमा साठी अपात्र असलेल्या 20 हजार शेतकऱ्यांची माहिती पाहूया..

राज्यातील शेतकऱ्यांची पिके जसे की सोयाबीन, कापूस, तुर करपून गेले आहेत. याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पिक विमा कंपन्यांना आणखी काम करावे लागणार आहे. परंतु पिक विमा कंपन्यांनी त्यांचे सुरुवातीचे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. पहिलाच डाव त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात खेळला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 24 सप्टेंबर 2023

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु त्यांच्या आधार सातबारा व बँक पासबुक वर नावात चुका आहेत. किंवा थोडाफार बदल आहे अशा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी पिक विमा कंपन्यांनी त्रुटी काढण्यास सुरुवात केली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा..

छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात 25% म्हणजे तालुक्यातील पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांची पिक विमा कंपन्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे.

हे वाचा: बाजारात नवीन कापूस दाखल..! सध्या किती मिळतोय बाजार भाव

आता हीच टक्केवारी वाढण्याची शक्यता असून, ती 50 टक्के वर पोहोचू शकते. सिल्लोड तालुक्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी 69 हजार 684 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला.

तर जवळपास 20 ते 22 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरणा केलेली नाही. जवळपास सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या 92 हजार 600 इतकी आहे.तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला केला आहे.

अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून त्रुटीचा मेसेज करण्यात आला आहे. ती त्रुटी बरोबर करण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालय सेतू या ठिकाणी भटकंती करताना दिसत आहेत.

यात महत्त्वाची बाब म्हणजे या अगोदर त्यात सातबाराचा उपयोग करून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ झाला आहे. परंतु पिक विम्याच्या वेळेसच त्रुटी का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Comment