या 30 जिल्ह्यांना पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यातील ती जिल्ह्यात पाऊस पडत राहणार आहे. तसेच उरलेल्या जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राव हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील.

आजचा हवामान अंदाज

हे वाचा: कांद्याला मिळतोय 6000 हजार रुपये प्रति क्विंटल भाव..! वाचा सविस्तर..

आज सकाळपासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात तसेच विदर्भात आज पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 4 दिवस 30 जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे.

विदर्भातील जिल्हे: अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा या आठ जिल्ह्यात येत्या 12 सप्टेंबर पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे.

मराठवाड्यातील जिल्हे: छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे.

हे वाचा: संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजार भाव 6 सप्टेंबर 2023

खानदेश: धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार कॉमन विभागाने पावसाचा इशारा वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र: महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांना आज पावसाचा सतर्कतेचा इशारा आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज रायगड, मुंबई, रत्नागिरी, त्याचबरोबर ठाणे शहरात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव..!

Leave a Comment