राज्यातील या भागात दुष्काळाचे सावट गडद..! मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर

राज्यामध्ये यावर्षी पाऊस सुरुवातीपासूनच दांडी मारून बसला आहे. जून महिन्यात येणारा मान्सून राज्यामध्ये जुलै महिन्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवसाचा खंड दिला.

आता सप्टेंबर महिन्यात सुद्धा पावसाची काही चांगली चाहूल दिसेना त्यामुळे अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील तेरा जिल्हे दुष्काळाच्या धोक्यात असून काही जिल्हे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

हे वाचा: पहा महाराष्ट्रातील इतक्या भागात अवकाळी पाऊस..! IMD weather forecast

या जिल्ह्याचे वर्गीकरण रेड झोन मध्ये करण्यात आले आहे. यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. जनावरांना प्यायच्या पाण्याची तसेच चाऱ्याची सुद्धा गरज भासत आहे. राज्यातील विविध भागात सध्या पावसाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील या भागात मोठा पाऊस खंड परिस्थिती खूप गंभीर..

महाराष्ट्रातील 36 जिल्हा पैकी 13 जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भाग वगळता बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस सरासरी पेक्षा खूपच कमी झाला आहे. या भागांमध्ये येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील उद्भवतील अशी परिस्थिती आहे.

हे वाचा: 24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh

विशेष म्हणजे अहमदनगर, संभाजीनगर, हिंगोली, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धाराशिव, वाशिम, अकोला व अमरावती या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. जनावरांसह सामान्य नागरिकांच्या पाण्याच्या समस्या उद्भवत आहे. ला हवामान खात्याने रेड झोनमध्ये टाकले आहे.

या आठवड्यात पावसाची स्थिती काय..?

दरवर्षीपेक्षा यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील आठ ते दहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमीच आहे.

हे वाचा: panjab dakh: राज्यातील या भागात ढगफुटी..! पहा आज तुमच्याकडे पाऊस पडणार आहे का. ?

मराठवाड्यात काय स्थिती..

यावर्षी दरवर्षीपेक्षा पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा समस्या उद्भवत आहे. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड झोन मध्ये करण्यात आले आहे.

तेथील शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली दिसून येत आहे. छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील उद्भवत आहे. येथे पाणी टँकर ने पाणी पुरवले जात आहे. जर भविष्यात असाच पावसाचा खंड राहिला तर दुष्काळ देखील जाहीर होऊ शकतो.

Leave a Comment