यावर्षी नवीन सोयाबीनला मिळणार इतका बाजार भाव, नवीन सोयाबीन बाजारात दाखल..!

पावसाच्या खंडामुळे यावर्षी खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. जून व ऑगस्ट या महिन्यातील पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिकासह इतर पिके ही संकटात सापडली होती.

याचा मोठा परिणाम म्हणून सोयाबीन पिकात यंदा मोठी घट पाहायला मिळणार आहे. असा दावा तज्ञांनी केला आहे. दरम्यान अशाच जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी केलेल्या सोयाबीनची पेरणी आता ती सोयाबीन काढण्यासाठी तयार झाली आहे.

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील हरभरा बाजार भाव 13 सप्टेंबर 2023

काही ठिकाणी सोयाबीनची काढणी चालू आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढून बाजारात देखील आणली आहे. परंतु यावर्षी सोयाबीनच्या आवकामध्ये घट पाहायला मिळत आहे. दसऱ्यानंतर म्हणजेच विजयादशमीच्या दरम्यान बाजारामध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. अशातच जालना जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठेमध्ये नव्या आणि जुन्या सोयाबीनला 4 हजार ते 4500 इतका दर पाहायला मिळत आहे.

मात्र यावर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा घट पाहायला मिळण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. यांच्या मते सोयाबीन उत्पादकामध्ये महत्त्वाचे असलेले देश म्हणजे ब्राझील आणि अमेरिका परंतु कमी झालेल्या पावसामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे या देशातील देखील सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सुद्धा सोयाबीन उत्पादनात घट पाहायला मिळणार असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.

तज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढेल. व आवक कमी होईल. यामुळे सोयाबीन भाव कडाडतील. अशातच पुणे कृषी विभागातील तज्ञांनी सोयाबीनचा भाव विषयी नवीन भाकीत दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या किमती 4700 ते 5200 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहू शकतात.

हे वाचा: bajar bhav: गुजरात राज्यातील आजचे मंडी कापूस बाजार भाव 13 सप्टेंबर 2023

वरील भाव हे एफ एकू कॉलिटीच्या सोयाबीनला मिळणार असल्याची माहिती दिली आहे. व वरील अंदाज हा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकाचा अंदाज घेऊन तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार होऊ शकतो.

Leave a Comment