आज विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार WEATHER UPDATE

havaman andaj बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात परत एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे. बरोबर मराठवाड्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज देखील वाटण्यात आला आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो.

हे वाचा: अखेर महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील उर्वरित भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे. व कच्छमध्ये आणि कोमोरिन परिसरात नवीन चक्रीय वारे तयार झाले आहे. या वातावरणामुळे मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी दाट ढगाळ वातावरण होत आहे.

आज सकाळपासून मराठवाड्यात आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अनुकूल वातावरणामुळे आज विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हे वाचा: IMD: येत्या 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नगर. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कोकणामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. ची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

एकंदरीतच पावसासाठी तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यात आज बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा व विदर्भात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे वाचा: पुढील 3 दिवसात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! पहा पावसाविषयी नवीन अंदाज Heavy rain

यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह आज पाऊस पडू शकतो.

तर उत्तरमहाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यात विजांच्या कडकड्यासह हलका तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Leave a Comment