आज पासून या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडानंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठे जीवनदान मिळाले आहे.

परंतु शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची गरज आहे. राज्यातील बऱ्याच भागात अजून सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कधी..? पंजाबराव डख यांनी स्पष्ट सांगितलं; panjabrrao dakh Nagpur

अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून बहुतांशी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.

विदर्भ उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे मुंबई आणि कोकणात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याचे लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे.

हे वाचा: panjab dakh: राज्यातील या भागात ढगफुटी..! पहा आज तुमच्याकडे पाऊस पडणार आहे का. ?

अजून किती दिवस आहे पाऊस..?

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आता असा देखील प्रश्न येतोय की, पाऊस अजून किती दिवस आहे. राज्यामध्ये 15 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

येत्या काही दिवसात राज्यातील कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सक्रिय होणार आहे. 15 सप्टेंबर पासून सुरू झालेला पाऊस 18 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच सोमवार पर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात इथून पुढे असे राहणार हवामान...! अवकाळी पाऊस पडणार का..? पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट Panjab Dakh

Leave a Comment