IMD: या जिल्ह्यात पडणार आज तुफान पाऊस..! IMD चा मोठा अलर्ट

ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सप्टेंबर महिन्यात हळूहळू सुरुवात होऊच लागली त्यात पण त्याने लवकरच उघडीप‌ दिली. सप्टेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवसच महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस पडला.

खरीप हंगामात पेरलेल्या पिकांना तो पुरेसा नव्हता. खरीप हंगामात पेरलेली पिके आता हळूहळू करपू लागले. शेतकऱ्यांना आता पावसाची खूप गरज आहे. अशातच हवामान विभागाने एक मोठा अंदाज दिला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात परतीचा पाऊस केव्हा पासून..? तज्ञांनी दिली माहिती..! Return rain

त्यांच्या अंदाजानुसार राज्यात पावसाचे लवकरच आगमन होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसेल.

त्यामुळे या भागातील जिल्ह्यांना येल्लो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याबरोबरच ठाणे, मुंबई व कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या मुसळधार पावसाचा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असा अहवान हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा: पंजाब डख म्हणतात हवामानात मोठा बदल..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Heavy rain

ही चक्रीय वाऱ्याची स्थिती लवकरच कमी दाबाचा पट्ट्यात बदलेल. त्यामुळे पुढील येत्या काही तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे.

येत्या 15 सप्टेंबर पासून या पावसाचा अजून जोर वाढेल अशी माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे. येत्या काही दिवसात विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रत पुन्हा एकदा जोरदार पाऊस सक्रिय होईल.

असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 सप्टेंबर पासून सुरू झालेला पाऊस 18 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कानान कोपऱ्यात पसरेल. असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात अजून इतके दिवस राहणार हवामान कोरडे ; काय म्हणतात पंजाबराव Panjabrao dakh Havaman Andaj

Leave a Comment