शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ट्रॅक्टर ट्रॉली मिळणार 50 टक्के अनुदानावर

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॉली घेण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

यांत्रिकीकरणाला गती मिळाली. व शेतकऱ्यांच्या शेतीचे कामे लवकरात लवकर व्हावी या दृष्टिकोनातून सरकारने या योजनेचा अवलंब केला आहे. सध्या यांत्रिकीकरणाला गती मिळण्याचे चित्र दिसत आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित..!

परंतु लॉटरी उशिराने निघाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यात यांत्रिकीकरण योजनेची 1 हजार 860 लाभार्थी शेतकरी न मिळालेल्या निधीमुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता अनुदान मिळावे. अशी विनंती करण्यात येत आहे. राज्य सरकार द्वारे कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला गेला आहे.

रोजगारांची चिंता व कमी पडणाऱ्या मनुष्यबाळामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील बरेच कामे रखडतात. त्या कामांना मोठा विलंब होतो. हा वेळ टाळण्यासाठी, त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांना कृषी यंत्रणे अनुदानित दारात उपलब्ध करून देण्यासाठी. कृषी विभाग आणि कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली.

हे वाचा: पीएम किसान योजनेबाबत आली आनंदाची बातमी..! पहा या तारखेला येणार 2000 रुपयांचा हप्ता PM KISAN YOJANA

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा..?

या योजनेचा अर्ज हा महाडीबीटी पोर्टल द्वारे सादर करणे आवश्यक असते. या योजनेसाठी महिला शेतकरी व वैयक्तिक शेतकरी दोघेही अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सहकारी संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकता.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चालू वर्षापासून सर्वसाधारण गटाला ट्रॅक्टर ट्रॉली साठी 45 टक्के अनुदान दिले जाईल. तर अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाईल.

हे वाचा: या जिल्ह्यातील 14 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार..! पहा मोठी अपडेट

लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना व विविध घटकातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक लहान शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.

Leave a Comment