या बाजार समितीमध्ये हळदीला मिळाला 13000 रुपये प्रतिक्विंटल भाव..! Turmeric Market

मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये एकूण 900 क्विंटल इतक्या हळदीची आवक झाली. व हळदीला प्रतिक्विंटल 10 हजार 200 ते 12100 प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

गेल्या अनेक दिवसापासून संत नामदेव या बाजारपेठेमध्ये हळदीच्या दरात वाढ होताना दिसत नाहीये. गेल्या आठवड्यात हळदीला सरासरी प्रतिक्विंटल भाव हा अकरा हजार रुपये इतका मिळाला.

हे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील तूर बाजार भाव 12 सप्टेंबर 2023

संत नामदेव हळद मार्केटमध्ये दररोज 600 ते 1100 क्विंटल नुसार 5 हजार 390 क्विंटल ची आवक झाली. सोमवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी या बाजारपेठेमध्ये एकूण 1000 क्विंटल हळदीची आवक झाली. व सरासरी भाव हा 11000 ते 13000 याप्रमाणे मिळाला.

13 ऑक्टोबर दरम्यान याच बाजारपेठेमध्ये एकूण 900 क्विंटल एवढ्या हळदीची आवक झाली होती. व त्याला सुद्धा सरासरी भाव हा 11000 ते 13000 रुपये दरम्यान भेटला होता.

गुरुवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर दरम्यान 800 क्विंटल एवढ्या हळदीची आवक होऊन किमान भाव दहा हजार ते बारा हजार इतका मिळाला होता. एकंदरीत पाहता वरील माहितीवरून असे लक्षात येते की, या बाजारपेठामध्ये हळदीच्या भावात चढ उतार होताना दिसत नाहीये.

हे वाचा: कापूस बाजार भावात होणार मोठी वाढ..! कापूस आयात महागले Cotton imports

Leave a Comment