havaman andaj: धोका वाढला 18,19,20 सप्टेंबर; राज्यातील या भागात जोरदार पावसाचा इशारा..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या वेळेची पावसा संदर्भात खूप मोठी बातमी समोर येत आहे. आत्ता 18 19 आणि 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागात ढगफुटीसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.

तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की कोणत्या भागात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वच भागांमध्ये 18 19 आणि 20 या तारखांना अतिवृष्टी सारखा पाऊस होणार आहे.

हे वाचा: पुढील तीन दिवसातच राज्यातील या भागात पाऊस..! पहा सविस्तर

तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, मुंबई, ठाणे, पालघर वसई वीरा, कल्याण डोंबिवली यासोबतच नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती सुद्धा दिली आहे. याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर नागपूर गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पंजाबराव डख यांनी सुद्धा असाच अंदाज दिला आहे.

हे वाचा: येत्या 24 तासात या अकरा जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस..!

Leave a Comment