घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस; राज्यातील या जिल्ह्यांना इशारा heavy rain

देशामध्ये आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून. देशामध्ये आजपासून विविध राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणारा आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

त्याचबरोबर दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. देशातून मान्सून माघारी फिरल्यामुळे गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढलेला दिसत आहे. परंतु या पावसामुळे बऱ्याच भागांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मोलाचा सल्ला; काय म्हणले डख वाचाच एकदा Rabi season

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असुन काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे.

दिल्ली मध्ये सकाळी सकाळी गुलाबी थंडी जाणवत आहे. विभागाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे येत्या काही दिवसातच दिल्लीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल.

पुढील 48 तासात महाराष्ट्रात पाऊस..?

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात या गव्हाच्या जातीची करा पेरणी..! व मिळवा भरघोस उत्पन्न Panjabrrao dakh

राज्यातून मान्सूनचा परतीच्या प्रवासाला सुरुवात जरी झाली असली तरी अजून पूर्णपणे मान्सून माघारी फिरलेला नाही. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र मध्ये कोकणासह इतर जिल्ह्यांना देखील विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा: यावर्षी हिवाळ्यात पाऊस पडणार का..? पहा हवामान विभागाचा अंदाज

Leave a Comment