पहा येत्या 24 तासात राज्यातील या भागात जोरदार पाऊस

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे मराठवाड्याबरोबरच विदर्भातही बऱ्याच भागात पाऊस पडत आहे. राज्याच्या काही भागात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा: पाऊस आला रे आला : येत्या दोन दिवसात राज्यातील या भागात होणार सलग पाऊस

बंगालच्या खाडी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता चक्रीय वाऱ्यात झाले असून. सध्या ओडिसा या राज्यात कार्यरत आहे. एकंदरीतच या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पडण्याची शक्यता आहे.

आता हाच कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. बिकानेर पासून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

तर आज बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात पावसाची शक्यता वर्तवली असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

हे वाचा: राज्यातील या आठ जिल्ह्यांच्या मंडळांचा अग्रीम पिक विमा मंजूर..

असे हवामान खात्याने म्हटले आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आजसिंधुदुर्ग, रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे व उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि मराठवाड्यातील परभणी छत्रपती संभाजी नगर जालना या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रातील कोकण विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होईल. व पुढील 24 तासात कोकण मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे असे हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचा: पहा तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी होणार? हवामान खात्याकडून मोठे अपडेट

Leave a Comment