पंजाबराव डख काय म्हणतात पावसाबद्दल… जाणून घ्या सविस्तर

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. 21 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर आता सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी हळूहळू पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंडामुळे खरीप हंगामातील पिके करपू लागली. परंतु बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

हे वाचा: पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही... लगेच तपासा

आज म्हणजे सात सप्टेंबर रोजी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दमदार असेल लावली. काही ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अशातच प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज दिला आहे.

त्यांच्या अंदाजानुसार राज्यात आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. याच कालावधीमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. असे ते म्हटले आहेत.

याचबरोबर या पावसाचा जोर हा १२ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकरी सुखावेल व खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्यास मदत होईल.

हे वाचा: सोयाबीन कापूस मका पिक विमा मंजूर या जिल्ह्याला मिळणार 25 टक्के पिक विमा

हा पाऊस रब्बी हंगामासाठी सुद्धा उपयोगी येईल. आता पंजाबरावांचा अंदाज खरा ठरतो का, आठ ते बारा सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल का आता हे विशेष पाहण्यासारखे आहे.

Leave a Comment