नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार..? पहा सविस्तर

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना. या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची घोषणा 2023 मध्ये करण्यात आली होती. परंतु या योजनेचा एकही हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

हे वाचा: पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय crop loans

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने करिता आयटी ने सॉफ्टवेअर तयार केले आहे. परंतु अजून सुद्धा त्याची अंतिम चाचणी झालेली नाही. त्यामुळे सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आला नाही.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेकरिता पी एम किसान योजनेचे निकष व माहिती वापरली जाणार आहे. त्यामुळे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांची संख्या अजूनही निश्चित झालेली नाही.

शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता एप्रिल जून महिन्यादरम्यान मिळणार होता. परंतु अजूनही तो मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांच्या दिवाळीत अडथळा; पिक विमा कंपन्यांकडून 25% पिक विमा देण्यास नकार Crop Insurance loan list

Leave a Comment