यंदा नवरात्रात कुठे पडणार मुसळधार पाऊस..? पहा पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज panjab dakh

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता राज्यात परत एकदा पावसाने चांगलीच उघड दिल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काही दिवसातच नवरात्र देखील सुरू होणार आहे. येत्या तीन दिवसातच म्हणजेच 15 ऑक्टोबरला संपूर्ण भारत देशात घटस्थापना होते. यापासून देशभरात पुढील नऊ दिवस नवरात्र साजरा केली जाते.

तसेच नवरात्र विजयादशमी पर्यंत राहणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की यादरम्यान पाऊस पडेल का..? या प्रश्नाचे उत्तर देतानाच पंजाबराव डख म्हणतात की , दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यभरात 11 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहील. व नवरात्र उत्सव दरम्यान काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडेल.

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील सावंतवाडी, देवगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुसळधार ते आती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली नाही.

एकंदरीतच पंजाबराव डख यांचा अंदाज लक्षात घेता नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. पडला तरी काही भागात भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु नवरात्र उत्सव संपताच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर नंतर हवामानामध्ये बदल होऊन राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या काळात पाऊस पुन्हा एकदा चांगलि हजेरी लावण्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

हे वाचा: imd alert: महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा..!

Leave a Comment