यावर्षी हिवाळ्यात पाऊस पडणार का..? पहा हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसापासून तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक ही उखाड्याने त्रस्त झाले आहेत.

परंतु अशा परिस्थितीतच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात काल रात्रीपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.

हे वाचा: राज्यातील या भागात दुष्काळाचे सावट गडद..! मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर

विशेष बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात काल म्हणजेच 17 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली आहे .

व शेतकऱ्यांना रब्बी पेरणी करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. परंतु राज्याच्या इतर भागात उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की देशात हिवाळ्याला कधीपासून सुरुवात होईल..?

त्याचबरोबर यंदा हिवाळ्यात हवामान कसे राहणार..? राज्यात हिवाळ्यात पाऊस पडणार का..? असे देखील प्रश्न सामान्य नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत.

हे वाचा: राज्यातील या भागात दमदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

याबाबतच हवामान विभागाने महत्त्वाची माहिती देखील दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील अल निनोच्यचा तीव्रतेत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

याचाच परिणाम म्हणून राज्यात यावर्षी हिवाळ्यात देखील नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागनार आहे. याच दरम्यान हवामान खात्याने सुद्धा पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते राज्यातील अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

हे वाचा: पुढील तीन दिवसातच राज्यातील या भागात पाऊस..! पहा सविस्तर

Leave a Comment