पुन्हा पाऊस सक्रिय पावसाची तीव्रता वाढणार का ? मराठवाडा/ खानदेश/ विदर्भ/ पश्चिम महाराष्ट्र/ कोकण पहा या आठवड्यातील पावसाचे प्रमाण

शेतकरी मित्रांनो तब्बल 21 दिवसाच्या पावसाचा खंडानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबर महिन्यात सुद्धा काहीच दिवस पाऊस पडला आता परत एकदा उघडीप दिल्याने सर्व शेतकरी बांधव परत एकदा चिंतेत आले आहेत.

त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. आत्ताच्या नवीन ताजा अंदाजानुसार आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण राहील. शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 15 आणि 16 तारखेला पाहिलं तर पावसाचे प्रमाण वाढतानाह पूर्व विदर्भात पाहायला मिळेल.

हे वाचा: imd: राज्यातील या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज..!

पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पुढील काही तासात पावसाचे प्रमाण वाढताना दिसेल. त्यानंतर त्या पावसाचा प्रभाव बुलढाणा, अकोला, जळगाव, नाशिक व मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 15 आणि 16 तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल

या जिल्ह्यात राहणाऱ ढगाळ वातावरण

नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये 15 आणि 16 ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाच्या सरी सुद्धा पडू शकतात.

हे वाचा: पंजाब डख म्हणतात नोव्हेंबर मध्ये असा पडणार महाराष्ट्रात पाऊस..! Panjab Dakh Andaj

16 सप्टेंबर नंतर खानदेशातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. जर शेतकऱ्यांना फवारणी करायची असेल तर शक्यतो १५ आणि १६ तारखेला टाळावे यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment